Saturday, July 17, 2010

आला पाऊस पाऊस

आला पाऊस पाऊस
किती छान सुटे वास

पाणी आणावया ढग पळती
पाणी बरसवूनी धरा सुखवीती
पावसात भिजताना
मौज वाटे माझ्या मना

आई म्हणे पुरे आता
ताप येईल भिजता, ताप येईल भिजता

आला पाऊस पाऊस आला पाऊस पाऊस....

बिच्चारा कावळा

कावळ्याने लावली
'लव्हली अ‍ॅण्ड लव्हली'

म्हणाला होणार मी गोरा-गोरापान
दुसर्‍यांन सारखा दिसणार छान !

म्हणतात ना मला काळा काळा
बघा, हंस आता झाला कावळा

दात घासेन खोलगेट खॅंसिगर्डनी
मॅक्वागार्ड मधले पीनार पाणी

होईल माझा गोड गळा
मला लाजेल कोकीळा

केली साबन फीक्स
लावीन फक्त टक्स

पॅंट घालीन टफ अ‍ॅण्ड टफ
पावडर लावायला मॉन्संसचा पफ

कावळा आता फार बदलला
पण त्यावर असरच नाही झाला

मग कावळा खूप-खूप रडला
साधेच रहाण्याचा निश्चय केला

गणपती बाप्पाशी गप्पा

नमस्कार माझा गणपती राया
का म्हणतात बरे तुला मोरया

तू किती आहेस मोठा
तुझे वाहन उंदीर किती छोटा

खरे तर तू माझे ऐक
तुझे वाहन बदलून टाक

पृथ्वीवर आहेत किती तरी मॉडेल
तुला यातील एक नक्कीच आवडेल

तू खातोस त्यातला मला दे ना एक लाडू
मी देईन तुला पाणी प्यायला छान छान गडू

देवात सर्वात मोठा तुझाच मान
करतात सारे तुझेच गुणगान

माझा राग नको येऊ देऊ गणपत्ती बाप्पा
मला आवडतात फक्त मारायला गप्पा

पाऊस वेडीपाऊस वेडी

पाऊस पडताना का महिती नाही मनाचं भिरंभिरं होते
फुलपाखरा प्रमाणे पंख लेऊन तुझ्या आजुबाजुस घुटमळते

हा पऊस येतो तो वेगळीच हुर हुर घेऊन येतो
मला तुझ्यात अधिक अधिक गुंतवून ठेवतो

असे वाटते पाखरू व्हावे मी, मला सोनेरी पंख फुटावे
क्षणाचा ही विलंब न लावता तुझ्या मिठीत विरघळून जावे

मला खरतरं पाऊस खूप खूप आवडतो
अन अशा पावसात तुझा विरह नकोसा होतो

कशी समजावू मी माझ्या वेड्या मनाला....
कशी सावरु सांग अशा चिंब ओल्या क्षणाला....


--------- श्वेता