Wednesday, June 28, 2017

आई

आठवत रहाते तुझी उबदार मीठी, तुझी गालावरची पापी
वाटत असते 'आई' तू कधीही येशील, मला कुशीत घेऊन शांत करशील
रात्र रात्र जागी आहे तुझी वाट पहातं, दाखवत नाही कोणाला पण रडत असते मनातं
तू तर तू दादां पण नेलस आणि मग मला का एकट सोडलस?
आठवत असेल तुला माझी देवाशी केलेली प्रार्थना, आईच्या श्वासाआधी माझा जीव जावा
देवाने पूर्ण ऐकलच नाही, जीव नेला श्वास नेलेच नाही
आज येवढ्या वर्षांनी पण तुझ्या साठी झुरते आहे, रोज तुझ्या भेटीसाठी एक एक श्वास मोजते आहे
तुझ्या विना जगणे म्हणजे रोजचे मरणे आहे, या जगरहाटी मध्ये सरणाशिवाय जळणे आहे
खरचं माझी आर्त तुला कळते आहे का? लवकर येऊन मला घेऊन जाशील ना?
 श्वेता ...

No comments:

Post a Comment